Thursday, September 24, 2009

प्रेमाचा केऒस

मला तिच्याशी बोलायला खूप आवडतं
ती म्हणते पाऊस मला आजकाल
पूर्वीसरखा आवडत नाही..
दिवसभर दोन क्षणही नसतो माझ्याबरोबर
रात्री मी लाडात येते तेव्हा
'ओवरटाईम जास्त झालाय, थकलोय अस सान्गून
वाहून जातॊ...

मग तू काय करतेस?
मी काय करणार..
त्याची नजर चुकवून जाते समुद्राकडे
तोही मग चिडवतो..
पाणी खारट असलं तरी तुझच होतं
आता गोड पाणी किती जणांबरोबर वाटून पितेस??
मग रात्रभर तो सर्वान्ग शहारत रहातो माझं
पहाटेला त्याच्या खारट पाण्यात
माझेही दोन थेम्ब टाकून
मी येते निघून..

तुला भिती नाही वाटत.. पावसाला कळालं तर??
भिती कसली त्यात
पावसाने समुद्राकडून बरच कर्ज घेतलय..
ते फिटे पर्यन्त तरी चिन्ता नाही..
पण फार कन्टाळा येतोय मला सगळ्याचा..
आता वाटतय की आकाशाला जावून भेटावं

आकाशाला कुठे भेटणार तू?
तिथेच... जिथे तुला कविता सुचतात..
मग आकाशाला तूझ्यापासून दूर नेईन...
त्याला थोडं शहाणपण देईन..
मग तुला तो विरहगीते नाही सुचवणार..
किती खूश होशील ना तू?

नाही ग!! मी खूश नाही होणार..
माझा श्वास अडकल्यासारखं वाटेल मला..
वाटायच तर वाटू दे...
मग आपण दोघं मिळून श्वास पकडायला धावू
मीच जिन्केन...
हॊ तूच जिन्कशील....

तूला नाही वाटत का रे माझ्याबद्दल वाईट??
मी म्हणतॊ माहित नाही..
आळशीचेस... आणि परावलम्बीसुद्धा..
चल जाऊ दे
पुन्हा घन्टा झाली.. तू जाशीलच आता
उद्या आठवणीने ये..
आणि मला माहितीये..
समुद्रानी तूलाही कर्ज दिलय...
सान्डतयं.....

ती निघून जाते आणि
मी बघत रहातो सावल्या
मग खूप विचार केल्यावर स्वतःशीच म्हणतो
कविता सुचायला लागलीये.. आकाश वाट पहात असेल......
 
Kavi : Shantanu

No comments:

Post a Comment