Thursday, September 24, 2009

तुझ्यासाठी

डोळ्यात पाणी सुकवून टाकेल बघून तुला....
पण तुझ्यासमोर रडणार नाही ती
तुझ्यासाठी जगाशीही आता कधी लढणार नाही ती..
आता तू तो नाही न राहिलास....
मग ती हि ती नाही राहणार...
सोबतीला तुझ्या कधीच आता दिसणार नाही ती....
मागशील साथ जेव्हा लागेल गरज...
पण मायेने हात कधी हाती धरणार नाही ती..
धरलेला हात सोडून द्यायचास ना...
सुखात आपल्या विसरून जायचास ना
आता विसरायला...
आठवणीचतच नाही राहणार ती..
निघून जाईल अशी कि...
दूर गेल्यावर दिसेल...
पाठमोरी.....
गरज वाटेल सोबत भासेल...
पण हात नसेल...
बोल्याच असेल खूप काही..
पण ऐकायला कोणाला वेळ नसेल...
रडशील परत ये म्हणशील...
पण आता कधीच तुझ्यासाठी परत येणार नाही ती..
कधीच नाही...
 

गाऊ कशी अंगाई

फुटक्या या संसारात
लाचार तुझी आई
कसे पाजू दूध? बाळा,
गाऊ कशी अंगाई?

बाप तुझा दरिद्री
दारू रोज ढोसतो
लाथा-बुक्क्यांचा माराने
मला पोसतो

झोपडी नाही बाळा
मग छप्पर कसे दिसेल?
अंगणात निजवता तुला
छप्पर तेथेच असेल........

अंगावरी नाही कापड
झोळी कशी बांधू?
भोकं पडलेल्या पदराने
वारा कसा घालू?

पोटासाठी नाही भाकर
दूधही आटले
तुझ्या जन्मासाठी
ऋण थोडेच फेडले!

सांग बाळ माझ्या
कोण दीनांचा नाथ?
आई-बाप असूनही
का तू अनाथ?

तुझ्या आसवांचे कष्ट
माझे हातही लाचार
म्हणूनच दुधावरही तुझा हक्क
अर्ध्या पोटावर!

मला ठाउक रे बाळा
अजूनही तू भूका
माझ्या अंगाईसाठी
अर्ध्या पोटावरी जागा!

या फाटक्या संसारात
बाळ गातो - आई-आई
दूध न देऊ शकली
तुझी लाचार आई!
सांग माझ्या बाळा
गाऊ कशी अंगाई?
गाऊ कशी अंगाई?
 

का ? का ?

दुपारची वेळ ...बाहेर रणरणते उन
सगलीकडे नीरव शांतता ....
मी खिडकीबाहेर डोकावतेय ......
मध्येच येणारी वारयाची झुलुक ..
मनाला स्पर्शुन जातेय ...... ..

मनात खुप विचार येत आहेत ...
एकामागून एक ...
येतच चाललेत ...
मला पुन्हा त्या भूतकालत घेवून चाललेत ......

आठवते एकेक गोष्ट ...
तुझी नि माझी पहिली भेट ....
तुझे ते माझ्याकडे पाहणं ..
माझं तुझ्या डोळ्यात धुंद होवून जाण....
तुजं रिमझिमत्या स्वरांमधे गानं..
माझे त्या स्वरांमधे बेभान होउन जाण ......
तुझा तो स्पर्श ...तुझे ते हास्य ......

अणि क्षणात ............... भानावर येते मी .......
जेव्हा आठवते .....
तू केलेली प्रतारणा ...
तू माझ्या भावनांशी चालावलेला खेळ ......

अणि मग वाटते .........
खुप मोठयाने रडावं ...
खुप मोठयाने ओरडावं ....
का ? का ? कशासाठी ..... ?

पण हुंदका दबुन राहतो .... आवाजही फुटत नाही ...

येत राहतात ...
फक्त अश्रु .... अश्रु ... अश्रु .....

Kavayatri : मोहिनी

माझे मन

आज मला काय होतय.. तेच काळात नव्हते..
कारण जे काही होतय ...ते माझ्या हातात नव्हते.||

सर्वा पुर्वी सारखे सुरळित आणि छान चालू होते...
कुठे तरी चुकतय.....असे मात्र उमगत होते...||

माझ्या मनाच्या विश्वात एकच कोलाहल चालू आहे.
पण का? कारण काय? तेही अजुन अंधारात आहे.||.

कधी वाटते हसावे..तर कधी वाटते रादावे..
कदाचित हे सगळे मनाचेच भास असावे||

कारण घडताय..चुकतय....ते प्रत्यक्षात आहे.
खूप विचार केला.. पण साला तोही व्यर्थ आहे||

बराच हिंडलो आनवणी वेड्या सारखा..एका हरवलेल्या उजेडाच्या शोधात..
सगळे सापडले पण जे पाहिजे तेच होते गायब या जगात||

मनाला दोष देऊन चालत नव्हते..असेही त्याची तर चुकी दिसत नव्हती.
कारण अंधारात उजेडला शोधण्याची त्याची धडपड मला दिसत होती||

माझी विचार करण्याची क्षमता ..मला आज दिसत होती
आणि दिसाण्या वरुन तरी ती खूपच लवकर संपत होती||

एवढा असूनही परिस्थितीचे उत्तर सापडत नव्हते..
आज मला गप्पा बसण्या वाचून गत्यंतर नव्हते ||

Kavi : डॉ जय

प्रेमाचा केऒस

मला तिच्याशी बोलायला खूप आवडतं
ती म्हणते पाऊस मला आजकाल
पूर्वीसरखा आवडत नाही..
दिवसभर दोन क्षणही नसतो माझ्याबरोबर
रात्री मी लाडात येते तेव्हा
'ओवरटाईम जास्त झालाय, थकलोय अस सान्गून
वाहून जातॊ...

मग तू काय करतेस?
मी काय करणार..
त्याची नजर चुकवून जाते समुद्राकडे
तोही मग चिडवतो..
पाणी खारट असलं तरी तुझच होतं
आता गोड पाणी किती जणांबरोबर वाटून पितेस??
मग रात्रभर तो सर्वान्ग शहारत रहातो माझं
पहाटेला त्याच्या खारट पाण्यात
माझेही दोन थेम्ब टाकून
मी येते निघून..

तुला भिती नाही वाटत.. पावसाला कळालं तर??
भिती कसली त्यात
पावसाने समुद्राकडून बरच कर्ज घेतलय..
ते फिटे पर्यन्त तरी चिन्ता नाही..
पण फार कन्टाळा येतोय मला सगळ्याचा..
आता वाटतय की आकाशाला जावून भेटावं

आकाशाला कुठे भेटणार तू?
तिथेच... जिथे तुला कविता सुचतात..
मग आकाशाला तूझ्यापासून दूर नेईन...
त्याला थोडं शहाणपण देईन..
मग तुला तो विरहगीते नाही सुचवणार..
किती खूश होशील ना तू?

नाही ग!! मी खूश नाही होणार..
माझा श्वास अडकल्यासारखं वाटेल मला..
वाटायच तर वाटू दे...
मग आपण दोघं मिळून श्वास पकडायला धावू
मीच जिन्केन...
हॊ तूच जिन्कशील....

तूला नाही वाटत का रे माझ्याबद्दल वाईट??
मी म्हणतॊ माहित नाही..
आळशीचेस... आणि परावलम्बीसुद्धा..
चल जाऊ दे
पुन्हा घन्टा झाली.. तू जाशीलच आता
उद्या आठवणीने ये..
आणि मला माहितीये..
समुद्रानी तूलाही कर्ज दिलय...
सान्डतयं.....

ती निघून जाते आणि
मी बघत रहातो सावल्या
मग खूप विचार केल्यावर स्वतःशीच म्हणतो
कविता सुचायला लागलीये.. आकाश वाट पहात असेल......
 
Kavi : Shantanu

खरंच देवा

रनरनते उन दिसते कसे...
पहिले नाही मी कधीच..
पण त्याचे चटके मात्र सोसलेत..
आयुष्यभर..

पहिल्या पावसाने भिजलेली माती..
किती सुंदर ते नाही माहीत मला..
पण, तिचा सुगंध मात्र भरलाय
माझ्या मनभर..

भरून आलेले आभाळ आणि वीज
पहिलेच नाही मी कधी..
पण त्यांच्या कडकडाटाने
मिळते मला चाहूल त्यांच्या येण्याची..

इंद्रधनू म्हणे सात रंग घेऊन येते..
कसे दिसते ते मात्र माहीत नाही..
पण किती आनंद देते हे कळते
सर्वांच्या आवाजावरून..

हे सर्व मी जाणून आहे तरीही..
एकदा मला हे जरा वेगळे अनुभवायाचे आहे..
ते उन.. तो पाउस.. भरलेले आभाळ..
इंद्रधनूचे रंग.. सारे सारे मला..
माझ्या डोळ्याने पहायचय....

फक्त एकदा दिसू देवा मला हे सारे कसे दिसते..
साठवून ठेवीन मनात सारे..
बंद करेन पुन्हा डोळे.. कायमचे..
खरंच देवा.. तुझी शपथ..
 
Kavi : Vinay

प्रेम !!...(तिला बघून स्वप्निलच्या मनातले विचार)..

प्रेम प्रेम प्रेम
कोणी सांगेल का मला प्रेम काय असत ?
प्रेमात पडल्यावर ह्रदयाच काय होत ?
दोन जीवांच प्रेम कस जड़त ?

कोणी म्हणते, प्रेम हे प्रेम असत !!
साऱ्या जगाला विसरवणार गुलाबी औषध असत !!
अन त्याला तिच्याकडे खेचणार एक चुम्बक असत !!

प्रेम हे प्रेम असत !!
तिला त्याच्याबद्दल अन त्याला तिच्याबद्दल
मनापासून वाटणार आकर्षण असत !!

त्याने तिच्यासाठी अन तिने त्याच्यासोबत
मनापासून निभावलेल वचन असत !!

प्रेम हे प्रेम असत !!
दारू सारख नशा असत!!
निभावल तर आठवणीत त्याला सुख मिळत !!
अन तुटल तर चंद्रमुखिचा देवदास बनवित !!

प्रेम हे प्रेम असत !!
सीतेने हनुमानाला दिलेल तुळशिपत्र असत !!
तिच्या प्रेमात त्याला तहान भूक सार विसरवत !!

कदाचित मी प्रेमात पडलो असेलही
पण प्रेमाची व्याख्या मला माहित नाही
कारण प्रेम करण्याचा अनुभवच मला नाही

प्रेम हे खरच प्रेम असत !!
अन हल्ली मला कुठेतरी ते जाणवत !!
जेव्हापासून तिला बघितल भूक मला लागत नाही
तिच्या आठवणीत झोपच मला येत नाही

तिला बघितल तेव्हा समजल
की प्रेम हे फक्त प्रेम असत !!
प्रेमात पडल्याशिवाय समजतच नसत !!
प्रेमात पडल्याशिवाय समजतच नसत !!

प्रेम हे प्रेम असत !!
पाण्यासारख नितळ असत !!
वाऱ्यासारख स्वैर असत !!

बर्फासारख थंड असत !!
गुलाबी थंडीतली उब असत !!

प्रेम हे प्रेम असत !!
काळ्या रात्रीच चान्दण असत !!
ताऱ्यासारख चमचमत असत !1

सुर्यासारख तेजस्वी असत !!
समुद्रसारख अथांग असत !!
आकाशासारख अनंत असत !!

प्रेम हे प्रेम असत !!
सायीसारख चवदार असत !!
साखरेसारख गोड असत !!

लिम्बासारख आम्बट असत !!
अन मिठासारख रोज रोज गरजेच असत !!

प्रेम हे प्रेम असत !!
कौटासारख टणक असत !!
गुलाबसारख मुलायम असत !!
तिच्या गुलाबी गालासारख कोमल असत !!

प्रेम हे फक्त प्रेम असत !!
एकमेकांवरचा विश्वास असत !!
तिच्याबद्दलाचा आदर असत !!
सोबतच्या आठवणी असतात!!
अन तिच्यासोबताच्या सोनेरी क्षणांच
ह्रदयात सठविलेल एक जीवन असत !!
ह्रदयात सठविलेल एक जीवन असत !!
 
Kavi : Swapnil

नियतीची चपराक

आताच कुठे सुरवात झाली होती माझ्या जखमा भरायला
आताच कुठे सुरवात केली होती मी तिच्या शिवाय जगायला

लग्न करून ती आली परत माझ्याच बाजुलाच रहायला
स्वप्न माझी, तिला मी दुसरया बरोबर जगताना पहायला

दुसरयाच्या संसारात पाहून तिला जीव होता जळत
ह्रुदयात लागलेली आग मग दारुने शांत होतो करत

दिवसा कुठेतरी भटकून रात्री नशेमध्ये घरी येत होतो परत
त्या अवस्थेत मला पाहून आई-बाबा आणि मित्रही होते रडत

स्व:ताला आणि त्यांना होणारा त्रास आता सहन होत न्हवता
म्हणुन या जीवनाला मी पूर्णविराम द्यायचा विचार केला होता

दुखाच्या त्या पुरात जगण्याची इच्छा ही होती बुडाली
पावले मग आपोआपच मरणाची वाट शोधत निघाली

वाटेत बघितल एका तरुणाच प्रेत मागे त्याच्या घरच्यांना रडताना,
त्याच्या आई-बापाला त्या असह्य व्यथेत जीव सोडताना,

आईला आपल्या मुलाच्या मरणाच दुःख सहन झाल न्हवत
बापाला खांद्यावर मुलाच्या प्रेताच वजन पेलवल न्हवत

ती भयानक चित्रे मला माझ्याही घरी दिसू लागली
नियतीची एक चपराक माझ्या कानाखाली बसली

माझ प्रेम, माझ दुःख हेच विचार करून मी स्वार्थी बनलो होतो
आई-बाबांचे निस्वार्थ प्रेम एका स्वार्थी मुलीसाठी विसरलो होतो

झाल गेल विसरून आता जगतोय स्व:तालाही फसवून
चेहरयावरच्या हास्यामागे सगळ्याच स्वार्थी भावना कोंडून

आता स्व:तासाठी नाही मी आई-बाबांसाठी जगतोय
नियतीने मला ठरवून दिलेली कर्तव्य पार पाडतोय
 

फकत झुरायचे

मी बघितले आहे प्रेम करून
मी बघितले आहे जीवाला त्रास देऊन

नकळत जीव गूंतला तिच्यात
कधी कसा कळलाच नाही
बोलण्यात वेळ कसा गेला
हे कोडे कधी उमगलेच नाही

अगदी ठरवून टाकले होते
प्रेमा साठी वाट्टेल ते आणि
प्रेमा पोटी होईल ते करायचे

अगदी आकाश पांघरायला लागले
किंवा जमीन अन्थरावी लागली तरी बघू
प्रेम हे वेड लावते हे खरे आहे
आणि ही सत्यता मी पडताळली आहे

पण प्रेमात पडल्यावर मला उमजले
ते एक सुंदर असे स्वप्न वाटले
फूलपाखराहून पण हलके मला वाटले

तिच्याशी बोलायला वेळ कधी पुरला नाही
एव्हढे बोललो की शब्द सुद्धा पुरला नाही
रुसवे फूगवे, गप्पा गोष्टी करता करताना
मनातल्या आसुक भावनांना खत घालताना
एक मंद धुंद सुखाचा अनुभव घेत होतो
तीच्या प्रेमाच्या विळख्यात अडकून गेलो होतो

जवळ येताना एक थंड वाऱ्याच्या झोता सारखी आली
आणि लांब जाताना वादळा प्रमाणे राख करून गेली
तीला बोलताना हसताना पाहून छान वाटायचे
तीला लांब जाताना पाहून आता फकत झुरायचे

काय चुकले काय हरवले
न उमगले न सापडले

आता काय फकत झुरायचे ............
आणि नव्या पर्वाची वाट पाहात बसायचे................!!!!!
 
Kacvi : Dinesh


 

विरह

करुनी ओळख यजमानाशी
घाव घातला मज हृदयाशी
जे झाले वाजवुनी सनई ताशे
कशाला हवे ते खोटे नाते
जीवनाची झाली आता माती
आठवणीने झुरणे राहिले हाती
पौर्णिमेच्या रात्रि नदी काठी
आठवते तुझी ती गुलाबी मीठी
दिसताच फुल तुझ्या आवडीचे
गंधा बरोबर येते उछवास स्मुतिचे
दिसले नसतील माझे अश्रु लग्नवेळी
होते नयन तुझे जाईजूई फुली
निरोप देताच अश्रुतुन घराचे
गणित केवल मीच करू जाणे
किती होते माहेरच्या वियोगाचे
किती होते ह्रदय चिरनऱ्या विरहाचे
दिलास निरोप मला हात हलवुनी
मी बोलत होतो "अश्रुच्या भाषेतुनी"
 
Kavi : Arun

प्रकाश बनुन वहायचय...

आकाशातून मला किरण बनुन..
कण कण झरायचय...
आंधाराच साम्राज्य सम्पऊन...
प्रकाश बनुन वहायचय...
कलेकलेने वाढणारा..
चन्द्र बनुन मला एकदा बघायचय..
अंधारात चमकण्याचि मजा लुटत..
आमावस्येला लुप्त होवून जायचय....
पण त्या आधी..
घरट्यातिल पिल्लू बनुन..
आईच्या चोचीने चरायचय....
अन एक दिवस पंखात बळ आणून..
उंच उंच उडायचय...
अन
आकाशातून मला किरण बनुन..
कण कण झरायचय...
आंधाराच साम्राज्य सम्पऊन...
प्रकाश बनुन वहायचय...

Kaviyatri : सपना


काहीच सुचत नाही

अश्रु बनून वाहून जाशील डोळ्यातून,
म्हणुन मी आत्ता कधी रडत नाही..........
तुझ्याविना प्रिये मला,
दुसर काहीच सुचत नाही...........

हृदयातुन स्वाशाचा जसा,
साथ कधिच सुटत नाही
खात्री आहे प्रिये मला तुझीमाझी
गाठ आत्ता आयुष्यभर तुटत नाही......

नजरेसमोर तू नसतेस जेव्हा ,
दुसर कुणीही का ग़ दिसत नाही.......
अन् मग येतेस जेव्हा समोर तेव्हा,
काय बोलू हेच मला सुचत नाही......

बोलायच तर आहे तुला खुप काही
पण शब्दच तसे का ग़ मिळत नाही....
मनात माझ्या काय आहे
हे तुला अजुन कस कळत नाही........

मनामधले ते अबोल शब्द
ओठांवर का ग़ येत नाही.........
तुझ्याविना प्रिये मला
आत्ता दुसर काहिच सुचत नाही
 
Kavi : Amit

 

आयुष्यं म्हणजे काय असतं

आयुष्यं म्हणजे असतो एक प्रवास
जो सुरु होतो,
आपल्या जन्मापासुन
न कदाचित
मरणानंतरही संपत नाही.

अनेक उन्हाळे-पावसाळे
पहायला मिळतात या प्रवासात.
काही सुखाचे क्षण
अनुभवायला मिळतात,
तर काही कायमचा
धडा शिकवुन जातात

काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात
तर काही जाणुन बुजुन
पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने
अर्धवटच राहुन जातात

अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात
काही पाने नकळत जोडली जातात
तर काही कोरीच राहुन जातात....
आणि मग शेवटी ह्या कोऱ्या
कागदांचे तयार होते एक वेगळेच पुस्तक
ज्याला आपण नाव देतो "माझे आयुष्यं".
 
Kavi : Devendra